top of page
Search

चहा

Updated: May 7




आपल्या देशात सध्या सर्वसामान्य लोकांसाठी चहा हे भूमीवरच अमृतच आहे. पुण्यनगरी अर्थात पुणे या विद्वानांच्या नगरात तर चहाला अमृततुल्य असे नाव आहे.चहा शरीरउपयोगी का अपायकारक?चहा किती प्यावा, कीती वेळा प्यावा,तो तयार कसा केला आहे,त्यात मसाला म्हणून काय घातलं आहे यावर ठरत की तो उपयोगी का अपायकारक.आयुर्वेदिक दृष्टीने बघितल्यास चहा कषाय आणि तिक्त रसाचा असून लघु व रुक्ष गुणांचा आहे.तर त्याचे वीर्य उष्ण आहे. चहा कफदोष कमी करणारा व वातदोष वाढवणारा असून उत्तेजक,श्रमहर, मूत्त्रल,जडता नाशक आहे. ज्वर, डोकेदुखी,सर्दी यामध्ये उपयोग करता येतो.चहा दोन पद्धतीने बनवता येतो१) क्वाथ पद्धतपाणी साखर दूध चहा पावडर एकत्र मिसळून २ते५ मिनिट उकळणेहि अपल्याकडील प्रचलीत पद्धत आहे.२) फांट पद्धतपाणी व साखर एकत्र उकळून घेणे,त्यात चहा पावडर टाकून त्याला ५ते ७ मिनिट झाकून ठेवावे नंतर त्यात आवश्यकतेनुसार गरम दूध मिसळावे.या दोन्ही पद्धतीमध्ये फांट पद्धत कमी हानिकारक आहे.जी प्रायः परदेशात वापरतात. चहा जास्त गरम पिल्यास तो तोंड, घसा, आमशय, रक्तवाहिन्या तसेच आतड्यातील श्लेष्मिक कलेचा-हास करतो. शीतकाळ तसेच वर्षा ऋतु मध्ये चहा मुळे कमी त्रास होतो पण ग्रीष्म ऋतू व शरद ऋतु मध्ये तसेच ऊष्ण प्रकृतीच्या, पित्त प्रकृतीच्या लोकांना चहा मुळे जास्त त्रास होऊ शकतो.दिवसभरात २ कपापेक्षा अधिक चहा घेऊ नये.

 
 
 

Comments


© Copyright 2025 Aarogya Sarthi Chikitsalya

bottom of page