गवती चहा
- Vd Varsha Galgali
- Oct 13
- 1 min read

गवती चहा हा उष्ण गुणधर्माचा, कफ व वाताला कमी करणारा, अग्नी वाढवणारा, पाचक अशा स्वरूपाचा आहे.
ताप, सर्दी, अपचन या मध्ये गवती चहा चा उत्तम उपयोग होतो.
पोट दुखणे तसेच पोट डब्ब झाल्यासारखे वाटणे यामध्ये याचा रस देतात.
गवती चहा मूत्र निर्माण करणारा घाम वाढवणारा, उत्तेजना निर्माण करणारा, मुखशुद्धी करणारा आहे.
गवती चहाच्या तेलाचा उपयोग त्वचा विकारनाशक व वातनाशक म्हणून होतो. आमवात, कंबर दुखी इ. मध्ये याच्या तेलाने अभ्यंग केला जातो.



Comments