top of page
Search

बिल्व

  • Vd Varsha Galgali
  • Oct 13
  • 1 min read
ree

 

बेल

-बेल हे चवीला तुरट आणि कडु असून उष्ण (गरम) आहे. तुरट व कडु असल्याने  कफ कमी करतो व उष्ण असल्याने वाताला कमी करतो.

-कच्चे बेलफळ पचनशक्ती वाढवणारे , शौचाला बांधून ठेवणारे व कृमीचा नाश करणारे आहे.

-पिकलेले बेलफळ तुरट, गोड आहे , गोड असल्याने शक्ती वाढवणारे आहे.

-बेलफळ हे गर्भाशयावरील सूज कमी करणारे, अंगावर पांढरे जाणे तसेच बाळंतपणानंतर होणारे आजार कमी करतो.

 बेलाचे मूळ हे वाताचे आजार , झोप न येणे इत्यादींमध्ये उपयुक्त आहे.

बेलाच्या पानांचा रस सर्दी,खोकला, दम लागणे इत्यादींमध्ये उपयुक्त आहे.

 
 
 

Comments


© Copyright 2025 Aarogya Sarthi Chikitsalya

bottom of page