उदुंबर
- Vd Varsha Galgali
- Oct 13
- 1 min read

उदुंबर (उंबर) हे चवीला तुरट असून पचायला जड आणि थंड आहे.
औषधींमध्ये उंबर साल,फळ, दूध, इत्यादीचा उपयोग केला जातो.
उंबर हे कफ ,पित्ताला कमी करणारे व उष्णतेचे विकार कमी करणारे आहे.
त्वच्या विकारांमध्ये उंबराच्या कोंबाचा लेप केला जातो.
लहान मुलांमध्ये दात येत असताना होणारे जुलाब तसेच इतर व्याधी मध्ये उंबराच्या दुधाचा उपयोग केला जातो.
स्त्रियांमधील मासिक पाळी मध्ये होणारा अधिक रक्तस्त्राव , पांढरे अंगावर जाणे यांमध्ये उंबराच्या सालीचा काढ्याचा चांगला उपयोग होतो.उंबराचे पिकलेले फळ हे कृमी (worm) निर्माण करणारे आहे.



Comments