फळे
- Vd Varsha Galgali
- Feb 27
- 1 min read
Updated: May 7

जांभूळपावसाळा सुरू झाल्याबरोबर टपोरी,जांभळ्या रंगाची सुंदर फळे बाजारात येतात.सुरुवातीपासूनच जांभूळाचा औषधी म्हणुन उपयोग केला जातो. पूर्णतः पिकलेली जांभूळ तुरट तसेच मधुर,शीत,पचायला जड,मलाला घट्टपणा आणणारे असतात .कफ पित्त दोष कमी करणारे असतात पण रुक्ष व शीत असल्याने वाताला वाढवणारे असतात.जांभूळाचे बी हे मधुमेहनाशक आहे.जांभूळ हे लहान मुले विशेष आवडीने खातात.जांभूळ हे अग्नि वाढवणारे, पाचक आहे.पपई पपईचे फळ हे खोडासच लागते पपईचा रस हा तिखट,कडू आहे,पपई ही उष्ण असून कफ, वात शामक आहे.पपईचे पक्व फळ पित्त शामक आहे पिकलेल्या फळास एक विशिष्ट सुगंध येतो. जेवणानंतर पपईच्या 1-2 फोडी खाल्याने जेवण व्यवस्थित पचते. पपईची बी ही कृमींचा नाश करणारी आहे. पपई गर्भिणी स्त्रीने खाऊ नये. कारण पपई ही गर्भाशयाला संकुचित करणारी आहे.सामान्यतः पपईचे शरीरावरील परिणाम शीतल असतात.संत्रेलिंबाच्या झाडाच्या समान रंग,रूप,आकार असणारी संत्र्याची झाडे असतात.संत्र्याचा रस हा तात्काल तृप्ती देणारा,उत्साह आणणारा आहे.गर्भिणीने पहिल्या महिन्यापासून ते प्रसुति पर्यंत नियमितपणे रस घेतला तरीही चालतो.संत्रे वात दोषाला कमी करतात.आयुर्वेदात या फळाला हृद्य अशी संज्ञा आहे.संत्री ही हृदयाला हितकर व मनाला प्रसन्नता देणारे फळ आहे.संत्र्याचा रस हा ज्वरहर(ताप कमी करणारा), तहान कमी करणारा तसेच रुचि निर्माण करणारा आहे.
Comments