आरोग्यदायी सूप
- Vd Varsha Galgali
- Apr 3
- 1 min read
Updated: May 7

१) मुगाचे कढण१ मूठ मुग/मुगाची डाळ/ छिलकेवाले मुग पातेल्यात किंचित् भाजून घ्यावे. त्यात १० ते १२ वाट्या पाणी घालून शिजवावे. शिजतांना त्यात चवीप्रमाणे गाजर, दूधी, पडवळ, कांदा, कोबी, फ्लॉवर, घेवडा अश्या भाज्या तसेच धणेजिरे पूड, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ घातल्यास चालेल व शिजवून प्यावे. यास वरून तूपाची फोडणी, लिंबाचा रस ४-५थेंब किंवा आमसूल घालावे.मुगाचे कढण आयुर्वेदानुसार अतिशय पथ्यकर आहे. मुग सर्व डाळीमध्ये श्रेष्ठ असून मुगाचे कढण कफपित्त कमी करणारे, पचनास हलके, भूक वाढवणारे, स्थूलता नाशक, ताप , सर्दी, खोकला इ. वर उपयुक्त आहे. २) पालक सूपपालक स्वच्छ धुवून चिरून तूपावर लसूण व मिरची घालून परतून वाफवून घ्यावा. मग मिक्सर मधून काढावा. त्यात धनेजिरे पावडर, मीठ टाकावे. आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. घट्टपणा येण्यासाठी थोडे गव्हाचे पीठ कालवावे. पालक ऐवजी बीट, गाजर, फ्लॉवर, फरस बी, कोबी यांचा वापर करू शकतो.हे सूप अधुनमधून घेण्यास चांगले आहे. पालक सूप पाचक, मलशुद्धी करणारे, भूक वाढवणारेआहे.
Comments