निर्गुंडी
- Vd Varsha Galgali
- Oct 13
- 1 min read

भारतामध्ये सर्वत्र आढळणारी अशी ही वनस्पती.
प्रामुख्याने याच्या पानांचा वापर व्यवहारात केला जातो.
याची पानं चवीला कडवट,
तुरट,थोडीशी तिखट असतात.
यांचा उपयोग कृमी, त्वचेचे रोग, सांधेदुखी, मूत्रजनन, आर्तवजनन यामध्ये होतो.
तसेच स्मरणशक्ती वर्धक,केस व डोळ्यांना हितकर असाही होतो.
सूज असणाऱ्या सर्व आजारात याचा उपयोग करता येतो.
सर्दी व घशाला सूज असताना याच्या पानाची धुरी दिल्याने चांगला उपयोग होतो.
सांध्यांच्या आजारात याच्या पानाचा शेक दिल्याने सूज व दुखणे यात फार लवकर आराम मिळतो.
याच्या पानापासून बनवलेले तेल व्रण नाडीव्रण,कुष्ठ,आमवात यामध्ये वापरतात.काही कारणाने लघवी अडकली असल्यास याच्या पानाने सिद्ध केलेल्या पाणी एका टबमध्ये भरून बेंबीपर्यंत चे अंग बुडेल असे बसावे. त्यामुळे पुष्कळ आराम मिळतो.



Comments