पावसाळ्यातील आजार
- Vd Varsha Galgali
- Apr 3
- 1 min read
Updated: May 7

पावसाळ्यात जशी बाहेर पाणथळ दलदल असते तसेच शरीरात सुद्धा थंडपणा व जलीय गुण वाढलेला असतो. त्यामुळे भूक कमी होणे, जुलाब, गॅसेस, पोटदुखी, सर्दी खोकला ताप कानदुखी जंत, साथीचे आजार बळावतात.भाजके अन्न खाणे आणि गरम पाणी पिणे ही खरं तर हे आजार होवू न देण्याची गुरुकिल्ली आहे. परंतु उलट पावसाचे वातावरण झाले की भजी वडे पाव मिसळ समोसे यासारख्या पदार्थांची सध्या चलती असते. मोड आलेली कडधान्ये खाल्ली जातात. परिणामी पोट बिघडणे हे अगदी स्वाभाविक आहेयासाठी धणे सुंठ ओवा घालून उकळलेले पाणी पिणे, हिंग तूप, ओवा बडीशेप भाजून चावून खाणे, पोट शेकणे असे प्राथमिक उपचार करावे. धणे जिरे हिंग लसूण ओवा बडीशोप हे पदार्थ खाण्यात ठेवावे. पुदिना आले कोथिंबीर कढीपत्ता लसूणपात यांची चटणी खाण्यात ठेवावी.शक्यतो लंघन करावे. भूक लागल्यास साळीच्या लाह्या तूपावर परतून सैंधव घालून खाव्या. चांगली भूक असल्यास गरम भात मुगाची खिचडी खावी.सर्दी खोकला घसा कान दुखी साठी तव्यावर कापड गरम करून कपाळ कान चेहर्यावर शेक घ्यावा. सुंठ वेखंड चंदन कापूर असा लेप घालावा. सुंठ हळद घालून उकळलेले दूध प्यावे. तुळस आले गवती चहा ज्येष्ठमध मीरे लवंग असा काढा करून गुळ घालून प्यावा. खोकल्या साठी ज्येष्ठमध बडीशेप खडीसाखर काळ्या मनूका असा काढा प्यावा.पिताना पाणी गरम असावे.या प्रथमोपचारांनी बरे न वाटल्यास वैद्याचा सल्ला घ्यावा.
Comments