top of page
Search

वर्षा ऋतुचर्या

  • Vd Varsha Galgali
  • Apr 3
  • 1 min read

Updated: May 7



ree

रखरखत्या उन्हाने हैराण झालेल्या आपल्या सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले असतात एक दिवस अचानक आकाश ढगाने भरुन जाते व जोराची पावसाची सर येऊन जाते.सध्याच्या कालमानाप्रमाणे अंशतः जेष्ठ, पूर्ण आषाढ व अंशतः श्रावण म्हणजेच जुन उत्तरार्ध , जुलै व ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात वर्षा ऋतु येतो वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर व आजूबाजूच्या सृष्टीवर होतो त्यानुसार शरिरातील दोष व पचन शक्ती इत्यादींचा विचार करून तसा आहार विहार ठेवावा लागतो वर्षा ऋतु पुर्वी असलेल्या उन्हामुळे शरीर दुर्बल झालेले असते .वर्षा ऋतु मध्ये सृष्टीत ओलसर पणा व आंबट पणा वाढतो. तसेच वातावरणात अचानक थंडपणा वाढीला लागतो. सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन वात दोषाचा प्रकोप होतो .पित्त दोष सुद्धा वाढतो परंतु वातावरणातील थंडाव्या मुळे त्याची लक्षणे दिसत नाही. पचन शक्ती दुर्बल होते भुक मंदावते . वरील सर्व गोष्टींचा विचार करता पचन शक्ती नुसार हलका आहार घ्यावा. उष्ण, थोडा स्निग्ध , भुक वाढविणारा व वात दोष कमी करणारा आहार असावा जुनी धान्य वापरावी. मुगाची खिचडी, ज्वारीची भाकरी, राजगिरा लाडु, उपमा, तूर ,मसूर, मुगाचे कढण, जुने तांदुळ ,गहू, सातूचा वापर करावा सैंधव घालुन ताक प्यावे, कुलथ्याचे पिटले, मठ्ठा, पुदिना चटणी, लसुण, आल ,यांचा वापर करावा मधाचा अल्प प्रमाणात वापर करावा.दुधी भोपळा, दोडका, सुरण ई भाज्या लसुनाची फोडणी देऊन सेवन कराव्या. पापड भाजुन खावे.

 
 
 

Comments


© Copyright 2025 Aarogya Sarthi Chikitsalya

bottom of page